Join us
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धार्थ मल्होत्राच्या आधी 'याच्या' प्रेमात आकंठ बुडाली होती आलिया, प्रसिद्धी मिळताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 18:39 IST

रणबीरच्या आधी आलिया सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत होती, पण...

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील आलिया आणि रणवीर सिंग दोघांच्या भूमिकेचे कौतुक होतंय.  फॅमिली ड्रामा, गाणी, कॉमेडी आणि रोमान्सने भरलेल्या या सिनेमाची स्टारकास्टही तेवढीच तगडी आहे. आलिया भट आणि रणवीर सिंग हे आजच्या पिढीचे कलाकार तर धर्मेंद्र, शबाना आजमी आणि जया बच्चन या दिग्गज कलाकारांची मांदियाळी यामध्ये आहे. आलियाने आतापर्यंत आपल्या करिअरमध्ये एका पेक्षा एक हिट सिनेमा दिले आहेत. प्रत्येक भूमिकेवर तिने आपली वेगळी छाप सोडली आहे. आलियाने काही महिन्यांपूर्वीच मुलगी राहाला जन्म दिला. लेकीच्या जन्मानंतर काही महिन्यातच ती कामावर देखील परतली. 

आलिया आणि रणबीर कपूर दीर्घकाळ एकमेकांना डेट करते होते. यानंतर दोघांनी गेल्यावर्षी लग्नगाठ बांधली. रणबीरच्या आधी आलिया सिद्धार्थ मल्होत्राला डेट करत होती. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर दोघांमध्ये काही तरी बिनसलं आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले. पण तुम्हाला माहिती आहे का इंडस्ट्रीत येण्याआधी अभिनेत्री अली दादरकरला डेट करत होती. 

आलिया व अली दोघेही शाळेतले मित्र आहेत. मुंबईत राहणारा अलीचं शिक्षण. जुहूतील जमनाबाई नरसी झालं. यानंतर  पुढच्या शिक्षणासाठी लंडनच्या युनिव्हर्सिटी ऑफ ससेक्समध्ये त्याने प्रवेश घेतला.अली हा पेशाने मॅकॅनिकल इंजिनिअर आहे. लंडनमध्येच त्याने ही पदवी घेतली.. अली व आलिया हे दोघे बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, असे मानले जाते. मात्र ‘स्टुडंट ऑफ दी ईअर’मधून आलियाने बॉलिवूड डेब्यू केला आणि यानंतर आलिया व अलीच्या वाटा वेगवेगळ्या झाल्यात. यानंतर आलियाचे नाव सिद्धार्थ मल्होत्राशी जोडले गेले. आलिया आणि अलीचं ब्रेकअप झालं. 

टॅग्स :आलिया भटरणबीर कपूरसिद्धार्थ मल्होत्रा