Join us

अखेर ‘बेबो’ करणार ‘गोलमाल ४’

By admin | Updated: July 1, 2016 01:01 IST

जसे आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगितले होते की, करीना कपूर ‘गोलमाल ४’ स्वीकारावा की नाही या संभ्रमात होती.

जसे आम्ही तुम्हाला यापूर्वी सांगितले होते की, करीना कपूर ‘गोलमाल ४’ स्वीकारावा की नाही या संभ्रमात होती. तिच्यासमोर ‘टीन’फेम दिग्दर्शक रिभू दासगुप्ताच्या आगामी चित्रपटाचा प्रस्ताव होता. या दोन्हीपैकी कोणाची निवड करावी यावर ती विचार करत होती; आणि आता अखेर तिने निर्णय घेतला! ‘हिट मशीन’ रोहित शेट्टीसोबतची यशाची मालिका कायम ठेवण्यासाठी तिने ‘गोलमाल ४’ला होकार दिला आहे. लवकरच ती याची शूटिंग सुरू करणार आहे. ‘गोलमाल २’पासून ती या विनोदी सीरिजशी जोडलेली आहे. अजय देवगण, अर्शद वारसी, श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या चौकडीने प्रेक्षकांना भरपूर हसविले. आता पुन्हा एकदा चाहत्यांना लोटपट करण्यास ते सज्ज झाले आहेत. करीनाने अजयसोबत यापूर्वी ‘ओमकारा’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या चित्रपटांत काम केलेले आहे.