शाहीद-मीराला घरी कन्यारत्न प्राप्त झाले आणि संपूर्ण कपूर कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता डिसेंबर महिन्यात असाच आनंद खान कुटुंबीयांनाही होणार आहे. बेगम आॅफ पतौडी करीना कपूर खान ही सध्या गरोदर असून, डिसेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. सध्या तरी बेबो तिचे गरोदरपण एन्जॉय करते आहे. मात्र, बाळाच्या जन्मानंतर ती करिअर करणार की त्याला पूर्णविराम देणार, असा प्रश्न तिला एका मुलाखतीत विचारण्यात आला तेव्हा ती म्हणाली, ‘मी माझ्या आयुष्याची कल्पना अभिनयाशिवाय करूच शकत नाही. कारण, मी माझ्या आयुष्यात फक्त अभिनयावरच स्वत:पेक्षा जास्त प्रेम केलं. त्यामुळे माझ्या बाळाच्या जन्मानंतर मी काही महिन्यांतच पुन्हा बॉलीवूड जॉईन करेन असा माझा विश्वास आहे.’
बेबो म्हणते, ‘अभिनयाशिवाय कसलं आयुष्य’
By admin | Updated: August 29, 2016 04:02 IST