सोनम कपूर व फवाद खान या ‘खुबसूरत’ चित्रपटातील जोडीला सर्वांनीच खूप लाइक केले. पुन्हा एकदा जर ही जोडी आपल्याला पाहायला मिळाली तर... सोनम व फवादची एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एका पाकिस्तानी दुधाच्या जाहिरातीसाठी ते दोघे एकत्र आले आहेत म्हणे. त्यात एकमेकांचा हात हातात घेऊन रोमँटिक कपलप्रमाणे ते बॉल रूममध्ये डान्स करताना दिसत आहेत. सोनम पांढऱ्या रंगाच्या मॅक्सीमध्ये सिंड्रेलासारखी दिसत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}