डेनियल क्रेग यांनी जेम्स बॉँडची भूमिका साकारण्यास नकार दिल्याने, त्याच्या जागी नवा बॉँड म्हणून अभिनेता टॉम हिडलेस्टन याचे नाव निश्चित समजले जात आहे, तर दुसरीकडे गेम आॅफ थ्रोन्सची स्टार एमिला क्लार्कनेसुद्धा हा खुलासा केला की, ती पहिली महिला आहे, तिला ब्रिटिश सुपरस्पायची भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. २९ वर्षीय एमिलाने सांगितले की, हे तिचे सगळ्यात मोठे प्रोफेशनल ड्रीम होते. माझे बरेचसे स्वप्न आहेत जे पूर्ण होणार आहेत. ज्यामध्ये भविष्यात मला जेम्स बॉँडची भूमिका साकारण्याची इच्छा असून, लीडिंग रोलमध्ये लियोनॉडी डिकेप्रियो हा अभिनेता असायला हवा. द एक्स फाइल्सची अभिनेत्री गिलीयन अँडरसनने गेल्या आठवड्यातच डॅनियलची जागा मला घ्यायची असल्याचे वक्तव्य केल्याने ती माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली होती. सध्या एमिला ‘बिफोर यू’ या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. या चित्रपटाची कथा एका रोमॅँटिक कांदबरीवर आधारित आहे.
बॉँड गर्ल व्हायचेय
By admin | Updated: June 6, 2016 01:09 IST