Join us
Daily Top 2Weekly Top 5

बानूला मिळाला मोठा ब्रेक

By admin | Updated: October 20, 2014 01:58 IST

जय मल्हार’ मालिकेमध्ये बानूची भूमिका साकारणाऱ्या ईशा केसकर या अभिनेत्रीला ‘सीआरडी’ या हिंदी सिनेमात काम मिळाले आहे.

‘जय मल्हार’ मालिकेमध्ये बानूची भूमिका साकारणाऱ्या ईशा केसकर या अभिनेत्रीला ‘सीआरडी’ या हिंदी सिनेमात काम मिळाले आहे. तरु णाईचं विश्व साकारणाऱ्या या सिनेमात ईशाची महत्त्वाची भूमिका आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन क्र ांती कानडे करीत असून, हा सिनेमा भारताबरोबरच आणखीही काही देशांत प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. या सिनेमासाठी आॅस्कर पुरस्कार विजेते सिनेमॅटोग्राफर डॅनिअल केत्झ यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, हॉलीवूडच्या आणखीही काही तंत्रज्ञांनी काम केले आहे. ‘जय मल्हार’मध्ये ईशाची बानूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्याआधी तिने ‘मंगलाष्टक वन्स मोअर’, ‘हॅलो नंदन’, ‘वी आर आॅन आता होऊन जाऊ द्या’ अशा काही मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ईशा कॉलेजांच्या एकांकिका स्पर्धांमध्ये सहभागी होत होती.