सध्या ‘बजरंगी भाईजान’ची तुफान चर्चा सुरू आहे. सलमान त्याचे दोन मित्र शाहरूख आणि आमीरसाठी ‘बजरंगी’ सा विशेष शो आयोजित करत आहे. त्याशिवाय हा चित्रपट सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शाहरूख आणि आमीर यांना वेळ असेल तेव्हा सलमान त्यांच्यासाठी चित्रपटाचा शो ठेवणार आहे. आमीर ‘दंगल’ची शूटिंग करणार असून शाहरूख ‘रईस’ मध्ये व्यस्त आहे. चर्चा अशीही आहे की,‘ ज्यादिवशी ‘बजरंगी’ प्रदर्शित होणार आहे त्याचदिवशी ‘रईस’ चा ट्रेलरही लाँच केला जाणार आहे. सलमानच्या चाहत्यांच्या मार्फत शाहरूख त्याच्याही चित्रपटाचा जोरदार प्रचार करून घेणार असे दिसते आहे.
‘तीन खान’ सोबत पाहणार ‘बजरंगी भाईजान’
By admin | Updated: July 10, 2015 00:05 IST