ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - फक्त तेलुगू सिनेमांपुर्ती मर्यादित ओळख असलेल्या प्रभासला बाहुबलीच्या भूमिकेमुळे बॉलिवूडसह जगभरात वेगळी ओळख मिळवून दिली आहे. एप्रिलमध्ये बाहुबली -2 चित्रपट तिकीटखिडकीवर झळकणार आहे. हा चित्रपट रिलीज होताच, प्रभास लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार प्रभासने स्वत:साठी वधू निवडली असून लग्नाची तारीखही जवळपास ठरलेली आहे.प्रभासचे कुटुंबीय या बातमीची घोषणा करण्यास आतूर आहेत. त्यांना केवळ एका योग्य क्षणाची प्रतीक्षा आहे. कदाचीत बाहुबली - 2 च्या यशानंतर प्रभासच्या लग्नाची घोषणा होऊ शकते. प्रभासची होणारी वधू कोण, कुठली? हे अद्याप कळू शकलेले नाही. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रभासची होणारी बायको त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी लहान असून ती इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी आहे.ताकद आणि असाधारण शक्तीच्या जोरावर बाहुबलीने प्रेक्षकांना भुरळ घातली. व्हिज्युअल इफेक्ट्स आणि दमदार अभिनयाच्या जोरावर सिनेमाने 2015 मध्ये बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. बाहुबली प्रभासने या अद्याप लग्नाच्या बातमीला दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे सध्या तरी ही नुसती चर्चा आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून चित्रपट प्रेमीमध्ये बाहुबली २ याच चित्रपटाविषयीच्या बहुविध चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहेत. अशा या बहुप्रतिक्षित बाहुबली २ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. २ मिनिटे 24 सेकंदांच्या या ट्रेलरने अनेकांचे लक्ष वेधले आहे. बाहुबलीच्या पहिल्या भागाची पार्श्वभूमी देत ट्रेलरला सुरुवात होते. बाहुबली २ मध्ये प्रभास, राणा डग्गुबती, तमन्ना भाटिया, अनुष्का शेट्टी, सत्यराज, राम्या कृष्णन हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहेत. हा चित्रपट २८ एप्रिलला तेलगु, हिंदी, तमिळ आणि मल्ल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
बाहुबली प्रभास अडकणार लग्नबंधनात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2017 07:01 IST