Join us

'बाहुबली - 2' चा ट्रेलर या दिवशी होणार रिलीज

By admin | Updated: March 11, 2017 21:43 IST

पाच राज्यातील निवडणूक निकाल आणि मोदी लाटेनंतरही आज दिवसभर बाहुबली ट्विटर ट्रेंडिगमध्ये होता. #Baahubali2Trailer अशा टॅगसह ट्रेडिंगमध्ये होता.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 11 - कटप्पाने बाहुबलीला का मारले? आबालवृद्धांना पडलेल्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला 28 एप्रिल 2017 रोजी मिळणार आहे. बाहुबली या बहुचर्चित चित्रपटाचा सिक्वेल बाहुबली : द कन्लूजन या नावाने प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी चित्रपटाचं नवं पोस्टर आज रिलीज केलं आहे. या पोस्टरमध्ये कटप्पाने बाहुबलीला त्याच्या हातामध्ये घेतलेलं दिसत आहे, तर दुसरीकडे बाहुबली कटप्पाला मारताना दिसत आहे. पाच राज्यातील निवडणूक निकाल आणि मोदी लाटेनंतरही आज दिवसभर बाहुबली ट्विटर ट्रेंडिगमध्ये होता.  #Baahubali2Trailer अशा टॅगसह ट्रेडिंगमध्ये होता.बाहुबली : द कन्लूजन याचे पहिले ट्रेलर 16 मार्च राजी आपल्या भेटीला येणार आहे. यापूर्वी महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर बाहुबली 2 या सिनेमाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. यामध्ये अभिनेता प्रभास म्हणजेच बाहुबली हत्तीच्या सोंडेवर आरुढ झालेला या दिसत आहे.ज्या मुलाला त्याने वाढवलं, त्याच मुलाला त्याने मारलं, या कॅप्शनसह राजामौली यांनी आज एक पोस्टर शेअर केली आहे. आमच्या डिझायनरला ही आयडिया सुचली आणि ट्वीट करण्याचा मोह आवरला नाही, असंही राजामौली यांनी म्हटलं आहे.दरम्यान, 'बाहुबली-दी कनक्ल्युझन' या सिनेमाने रिलीजआधीच 350 कोटींची कमाई केली आहे. वितरण हक्कांमधून कोटींची कमाई करत हा सिनेमा रिलीजपूर्वीच सुपरहिट झाला आहे. अर्का मिडिया वर्क्‍सच्या बॅनरखाली बाहुबली -२ या चित्रपटाची निर्मिती होणार असून यामध्ये अभिनेता प्रभास, राणा डग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत.