Join us

'बाहुबली-2' ने प्रदर्शनापूर्वीच कमावले 500 कोटी

By admin | Updated: February 2, 2017 17:59 IST

बाहुबलीचा दुसरा भाग भारतीय सिनेजगतात आणखी नवा इतिहास रचणार असंच वाटतंय. कारणंही तसंच आहे...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या सिनेमाने भारतीय सिनेजगतात कमाईचा नवा इतिहास रचला. दोन वर्षांपासून सिनेमाच्या दुस-या भागाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, बाहुबलीचा दुसरा भाग भारतीय सिनेजगतात आणखी नवा इतिहास रचणार असंच वाटतंय. कारणंही तसंच आहे, या सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच 500 कोटी रूपयांची कमाई केल्याचं वृत्त आहे.
 
सॅटेलाइट्स राइट्सच्या माध्यमातून बाहुबली-2 ने 500 कोटी रूपये कमावले आहेत.  बॉलीवूडचा दिग्दर्शक करण जोहर हा सिनेमा हिंदीत प्रदर्शित करणार असून यासाठी करणच्या धर्मा प्रोडक्शनने याचे अधिकार 120 कोटींना विकत घेतले आहेत. 28 एप्रिलला हा सिनेमा 4 भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.  
 
प्रभाष, राणा डग्‍गुबती स्टारर 'बाहुबली-2' बाबत लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून चर्चेत असलेला प्रश्न 'कटप्‍पा ने बाहुबली को क्‍यों मारा?' याचं उत्तरही मिळणार आहे.