Join us
Daily Top 2Weekly Top 5

MC Square बनला 'MTV हसल 2.0' चा विजेता! 'बदमाश छोरा'ला खुद्द विराट कोहलीनं केला होता मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 12:18 IST

'हिप हॉप मजहब' या गाण्यानं २०१८ साली आपल्या करिअरला सुरुवात केलेला रॅपर MC Square ने आता मोठं यश प्राप्त केलं आहे.

'हिप हॉप मजहब' या गाण्यानं २०१८ साली आपल्या करिअरला सुरुवात केलेला रॅपर MC Square ने आता मोठं यश प्राप्त केलं आहे. MTV च्या रॅप रिआलिटी शो 'हसल २.०' च्या टॉप-५ मध्ये पोहोचल्यानंतर MC Sqaure यानं आता थेट विजेतेपदाला गवसणी घातली आहे. हरियाणाच्या पलवल जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील MC Sqaure चं मूळ नाव अभिषेक बैंसला असं असून सोशल मीडियावर त्याची 'राम राम' आणि 'बदमाश छोरा' ही दोन गाणी प्रचंड व्हायरल झाली आहेत. 

अल्पावधीतच MC Square याची फॅन फॉलोइंग जबरदस्त वाढली आहे. यातच त्याचा देशातील सर्वात मोठा फॅनमध्ये भारतीय संघाचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली देखील आहे. नुकत्याच एका मुलाखतीत MC Square यानंच याबाबतची माहिती दिली. विराट कोहली माझा फॅन आहे हे मला जेव्हा कळालं तेव्हा खरंच माझ्यासाठी तो आश्चर्याचा धक्का होता, असं MC Square म्हणाला. विराट कोहलीनं आपल्याला इन्स्टाग्रामवर मेसेज करुन गाण्याचं कौतुक केलं होतं, असंही त्यानं सांगितलं. 

कोहलीच्या मेसेजमुळे यशाची जाणीव झाली"द विराट कोहलीनं मला मेसेज केलाय हे पाहून मला खरंच आश्चर्याचा धक्का बसला होता. विराटचा आजवरचा प्रवास आपण सर्वच फॉलो करत आलो आहोत आणि तो देशासाठी आदर्श आहे. मला माझ्या कुटुंबीयांकडून कळालं होतं की विराट कोहली तुला इन्टाग्रामवर फॉलो करतो. त्यानंतर कोहलीनं माझं कौतुक केलं त्या क्षणी मला खरंच वाटलं की मी काहीतरी मोठं काम केलं आहे", असं MC Square म्हणाला. 

'मराठी रॅप सुनने गुज्जू भी ...'; अमरावतीच्या मराठी पोट्टीचा सोशल मीडियात बोलबाला

कौतुकाचा कोणताही दबाव येऊ देत नाहीविराट कोहलीच्या सारख्या दिग्गजांकडून माझं कौतुक केलं जातं हे पाहून मला खूप आनंद होतो. माझ्या सादरीकरणाला मोठ्या प्रमाणात दाद मिळते हे माझं भाग्य आहे. माझं म्युझिक त्यांना आवडतं. जे मी करतोय ते त्यांना भावतं हे खरंच आनंद देणारं आहे. पण या कौतुकाचा दबाव मी माझ्यावर येऊ देत नाही. लोकांना आपलं वाटेल असं गाणं देण्याचा माझा प्रयत्न यापुढेही सुरू राहणार आहे", असंही MC Square म्हणाला. 

मराठमोठ्या मुलीनंही लावलं वेडMTV वरील Hustle 2.0 या कार्यक्रमात अमरावतीच्या आर्या जाधवनं सर्वांची मने जिंकली आहेत. तिनं मराठीत तिचा रॅप सादर केला होता. ज्याचं सोशल मीडियात खूप कौतुक झालं आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. यापूर्वीही अनेक मराठी रॅप टिकटॉक व्हायरल झाले आहेत. परंतु आर्यानं अनोख्या शैलीत अस्सल महाराष्ट्र पेहराव करून या शोमध्ये रॅप गायलं आहे. हसल २.० च्या स्टेजवर नववारी साडीत तरुणी येते. मोकळे केस, नाकात नथ आणि चंद्रकोर आणि पायात शूज असा भन्नाट लूक आर्या जाधवनं केला होता. आर्याच्या परफॉर्मन्सवर केवळ प्रेक्षकच नव्हे तर या शो चे परिक्षकही घायाळ झाले होते. रॅपमध्ये असलेल्या शब्दांची गुंफण पाहून बादशाहनंही तिचं कौतुक केलं होतं. 

टॅग्स :एमटीव्ही