Join us

‘बेबी’ आॅस्करच्या संग्रहालयात

By admin | Updated: April 18, 2015 23:40 IST

२०१५ साली अक्षय कुमारचा ‘बेबी’ या चित्रपटाने चांगले यश मिळवले. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचा वास्तववादी परिचयच या चित्रपटाने दिला.

२०१५ साली अक्षय कुमारचा ‘बेबी’ या चित्रपटाने चांगले यश मिळवले. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी काय करायला पाहिजे, त्याचा वास्तववादी परिचयच या चित्रपटाने दिला. त्याची दखल आता आॅस्करलाही घेणे भाग पडले. अ‍ॅकॅडमी आॅफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स संग्रहालयाने नीरज पांडे दिग्दर्शित ‘बेबी’ चित्रपटाची पटकथा कायमस्वरूपी संग्रहित करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आॅस्कर पुरस्कार मिळो न् मिळो पण अक्षय या स्वरूपात आॅस्करला पोहोचला आहे.