Join us
Daily Top 2Weekly Top 5

नव्या फोनची गजब कहाणी!

By admin | Updated: May 28, 2015 23:28 IST

एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवरून चिन्मयचा नवा मोबाइल चोरीला गेला. आपला फोन चोरीला गेल्याची पोस्ट चिन्मयने फेसबुकवर टाकली होती.

एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान सेटवरून चिन्मयचा नवा मोबाइल चोरीला गेला. आपला फोन चोरीला गेल्याची पोस्ट चिन्मयने फेसबुकवर टाकली होती. चोरट्याने चिन्मयच्या फोनमधील कॉन्टॅक्ट वापरून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला होता. आश्चर्य म्हणजे त्याने फक्त मोबाइलमधील मुलींच्या नंबर्सचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवला. यामध्ये चिन्मयच्या बायकोचा नेहाचाही समावेश होता. नेहाला याबाबत शंका आल्यामुळे तिने याबाबत चिन्मयला सांगितले. त्यानंतर अधिक चौकशी केल्यानंतर चोरट्याला पकडण्यात यश आले. इतकेच नाही, तर त्याच्याकडून मोबाइलही परत मिळाला. ‘नवा कोरा फोन होता, न सांगता गेला, न बोलावता आला,’ असे चिन्मयने फेसबुकवर लिहिले आहे.