Join us

जुहीला राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार

By admin | Updated: March 15, 2017 01:34 IST

जुही चावला हिचे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो तिचा हसरा चेहरा. सध्या जुही सिनेमांत सक्रिय नसली, तरी तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून ठेवली आहे.

जुही चावला हिचे नाव घेताच डोळ्यासमोर उभा राहतो तो तिचा हसरा चेहरा. सध्या जुही सिनेमांत सक्रिय नसली, तरी तिने बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करून ठेवली आहे. थोडीशी खट्याळ, काहीशी अल्लड अशी अभिनेत्री म्हणजे जुही चावला. सुमधुर हास्याने आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या जुही चावलाला अलीकडे एका पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यपाल विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या वेळी जुही नारंगी रंगाच्या सूटमध्ये दिसली. अभिनयासोबतच अनेक सामाजिक उपक्रमांत जुहीचा सहभाग राहिला आहे. किरणोत्सारी पदार्थ शिवाय प्लॅस्टिक वापराविरोधी अभिनयात जुहीने विशेष सहभाग नोंदवलाय. १९८४मध्ये ‘मिस इंडिया’ स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनय करण्याचे ठरविले. त्यानंतर १९८६च्या ‘सल्तनत’ या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर १९८८मध्ये आलेला ‘कयामत से कयामत तक’ हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला होता. या चित्रपटातील आमिर खान आणि जुहीच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती.