लेखकांना निर्मात्यांकडून योग्य ते मानधन दिले जात नाही. सध्या चित्रपट कोटींचा गल्ला जमवूनही लेखक मात्र उपेक्षित राहतो, अशी खंत अभिनेता आणि लेखक हेमंत ढोमेने सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केलीय. काही दिवसांपूर्वी हेमंतने याबाबत टिष्ट्वटरवरून नाराजीही व्यक्त केली होती, तर काही निर्माते लेखकांचे मानधनदेखील बुडवतात. अनेक दर्जेदार कथा लिहूनदेखील लेखक प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहतो, ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे मत हेमंत ढोमे याने सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केले.
लेखकांनाच मिळते दुय्यम वागणूक - हेमंत ढोमे
By admin | Updated: September 14, 2016 04:04 IST