Join us
Daily Top 2Weekly Top 5

अतुलची बैलगाडी सवारी

By admin | Updated: June 18, 2016 03:41 IST

‘सैराट’च्या झिंगाट गाण्यांनी संपूर्ण जगाला बेभान नृत्य करण्यास भाग पाडणारा संगीतकार अतुल गोगावले यांचा काही दिवसांपासून बैलगाडीची सवारी करत असतानाचा एक फोटो

‘सैराट’च्या झिंगाट गाण्यांनी संपूर्ण जगाला बेभान नृत्य करण्यास भाग पाडणारा संगीतकार अतुल गोगावले यांचा काही दिवसांपासून बैलगाडीची सवारी करत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे या फोटोविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती उत्सुक असल्याचे दिसत आहे. चाहत्यांची ही उत्सुकता पाहता लोकमत सीएनएक्सने अतुल गोगावले यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की, बैलगाडीची ही सफर एकदम झक्कास झाली. पौड येथील माझ्या मित्राच्या फार्महाऊस येथे क्लिक झालेला हा फोटो आहे. बैलगाडी सवारी होण्याचा हा क्षण जो आहे तो खरंच अप्रतिम होता. तसेच बिझी शेड्युलमधून स्वत:साठी असा वेळ काढणं बरं पडतं. आणि या ज्या जुन्या गोष्टी आहे ना, त्या आपल्याला कुठे तरी बांधून ठेवत असतात. जर माझ्याकडे जागा असेल ना तर मला बैलगाडी घ्यायलादेखील नक्कीच आवडेल, असेदेखील अतुल गमतीत म्हणाला. असो, पण अतुलचं हे सैराटपण त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस नक्कीच उतरलेलं दिसत आहे; कारण त्याच्या या क्लिकला प्रचंड लाइक्स मिळत आहेत.