Join us
Daily Top 2Weekly Top 5

'किकी चॅलेंज' फेम हॉलिवूड रॅपरसोबत अथिया शेट्टीचं अफेअर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:47 IST

नुकत्याच झालेल्या सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाची चांगलीच झाली. त्यानंतर लगेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरची चर्चा रंगली.

मंबई : सध्या बॉलिवूडमध्ये लग्न आणि वेगवेगळ्या अफेअरच्या चर्चा सतत सुरु असतात. नुकत्याच झालेल्या सोनम कपूर आणि आनंद आहुजाच्या लग्नाची चांगलीच झाली. त्यानंतर लगेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरची चर्चा रंगली. सध्या रणवीर आणि दीपिकाच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. 

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या कथित साखरपुड्याची चर्चा होत असताना अशातच आता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीच्या कथित अफेअरची सर्वांमध्ये चर्चा आहे. अथियाचं नाव कुण्या बॉलिवूड अभिनेत्यासोबत नाही तर चक्क हॉलिवूड रॅपरसोबत जोडलं जात आहे. ड्रेक असं या रॅपरचं नाव असून त्याची 'इन माय फिलिंग्स' आणि 'किकी चॅलेंज' ही गाणी चांगलीच लोकप्रिय आहेत. 

या दोघांचं नाव एकमेकांशी जोडलं जात आहे. कारण दोघेही सोशल मीडियात एकमेकांच्या कमेंटवर रिअॅक्शन देताना दिसले आहेत. त्यात वरुण धवनच्या एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झाले असे की, अथियाने तिचे वडील सुनील शेट्टी यांना वाढदिवसाला इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या.

अथियाच्या या शुभेच्छा देणाऱ्या कमेंटवर वरुण धवनने एक कमेंट केली. त्यात तो म्हणाला की, 'कुणाला माहीत तूच किकी होती'. तर वरुणच्या कमेंटवर खुद्द ड्रेकने रिप्लाय दिला. ड्रेकने लिहिले की, 'वरुण टिटी डू यू लव्ह मी?'. मीडिया रिपोर्टनुसार अथिया आणि ड्रेक यांच्यात काहीतरी सुरु आहे. असे म्हटले जात आहे की, दोघांची भेट लॉस एंजलिसमध्ये एका पार्टीत झाली होती. तेव्हापासून दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत. पण अजूनतरी दोघांनीही आपल्या रिलेशनशिपबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाहीये.

टॅग्स :अथिया शेट्टी बॉलिवूडसेलिब्रिटी