Join us  

पत्नी रुपाली बरुआसोबत बालीमध्ये एन्जॉय करताहेत आशिष विद्यार्थी, रोमाँटिक फोटो होतेय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:32 AM

अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi)  यांनी वयाच्या 57 व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. 50 वर्षीय रुपाली बरुआ हिच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली. दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. लग्नानंतर दोघे सिंगापूरला गेले होते. आता पुन्हा एकदा हे कपल व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसतेय. 

सोशल मीडियावर समोर आला फोटो आशिष विद्यार्थी यांची पत्नी रुपाली बरुआसोबत एक फोटोसमोर आले आहे. रुपाली आणि आशिष दोघेही त्यांच्या हॅप्पी प्लेसचा खूप आनंद घेताना दिसत आहेत. रुपाली आणि आशिषने स्वतः हा फोटो त्यांच्या चाहत्यांसोबत इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये रुपालीने लिहिले- ग्लोरी ऑफ टुगेदरनेस. आशिष विद्यार्थी यांनी २५ मे रोजी रुपाली बरुआशी लग्न केले होते. आसाममध्ये राहणाऱ्या रुपालीशी त्यांनी आसामी रितीरिवाजानुसार लग्न केले.

रुपाली बरुआ फॅशन इंडस्ट्रीशी निगडीत आहे आणि कोलकाता येथे फॅशन स्टोअर मालकीची आहेत. आशिष या लग्नाचे वर्णन एक असामान्य भावना म्हणून करताना दिसले. ते म्हणाला, "आमची प्रेमकथा ही एक लांबलचक कथा आहे जी कधीच सांगता येणार नाही. आम्ही काही काळापूर्वी भेटलो होतो आणि आमच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला. आम्हा दोघांनाही आमचं लग्न अगदी साधेपणाने करायचं होतं. आम्ही नक्कीच गेट-टुगेदर पार्टी करू. ."

आशिष विद्यार्थींना आहे २३ वर्षांचा मुलगाआशिष विद्यार्थी यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांची पहिली पत्नी राजोशी विद्यार्थी होती जिच्यापासून त्यांचा घटस्फोट झाला. याशिवाय आशिष यांना पहिल्या पत्नीपासून एक मुलगाही आहे. त्यांच्या मुलाचे नाव अर्थ विद्यार्थी असून तो २३ वर्षांचा आहे.

टॅग्स :आशिष विद्यार्थी