Join us  

५७व्या वर्षी दुसरं लग्न केल्यामुळे झालेल्या ट्रोलिंगवर आशिष विद्यार्थींनी ट्रोलर्सला सुनावलं, म्हणाले, "तुम्हाला कोणतीही गोष्ट ..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 1:51 PM

दुसरं लग्न केल्यामुळे झालेल्या ट्रोलिंगवर आशिष विद्यार्थीं पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, "आम्ही दोघं..."

सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी त्यांच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आले होते. ५७ वर्षीय आशिष विद्यार्थी यांनी काही महिन्यांपूर्वी रुपाली बरुआबरोबर दुसरं लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आशिष विद्यार्थी यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. दुसऱ्या लग्नामुळे झालेल्या ट्रोलिंगवर आशिष विद्यार्थी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आता पहिल्यांदाच आशिष विद्यार्थी आणि रुपाली बरुआ यांनी लग्नानंतर झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य करत ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत. 

लग्नानंतर कित्येक महिन्यांनी आशिष विद्यार्थी आणि रुपाली यांनी ट्रोलिंग आणि निगेटिव्ह कमेंट्सवर भाष्य केलं आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले, "तुम्हाला कोणतीही गोष्ट सिद्ध करण्याची गरज नाही. आम्ही दोघं कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी तिथे गेलेलो नव्हतो. त्यामुळे चिडून काही होणार नाही. त्यापेक्षा काहीतरी असं करा, ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल." 

२३ वर्षांनी येणार 'धडकन २'! सुनिल शेट्टी, अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टी पुन्हा दिसणार एकत्र?

आशिष विद्यार्थी यांच्याबरोबर लग्न केल्यानंतर झालेल्या ट्रोलिंगवर रुपाली बरुआ यांनीही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, "मी या गोष्टींकडे लक्ष देत नाही. कारण, त्या लोकांना मी ओळखत नाही. मी जास्त कमेंटही वाचत नाही. माझ्या जवळच्या माणसं माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे मला अन्य लोकांमुळे फरक पडत नाही." 

'जवान'ला टक्कर देतोय दिग्पाल लांजेकरांचा 'सुभेदार', बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच

रुपाली बरुआ यांच्याबरोबर लग्न करण्याआधी आशिष विद्यार्थी यांनी राजोशी यांच्याबरोबर विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आहे. राजोशी यांना घटस्फोट देत आशिष विद्यार्थी यांनी रुपालीशी दुसरं लग्न केलं. 

टॅग्स :आशिष विद्यार्थीसेलिब्रिटी