ज्यांच्या स्वरांना तारु ण्याचे वरदान आहे, त्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी आता अळीमिळी गुपचिळी घेतली आहे; नाही म्हणजे यातून काही वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, तर आशा भोसले यांनी आता ‘अळीमिळी गुपचिळी’ असे बोल असलेल्या गाण्याला स्वर दिला आहे. ‘मर्डर मेस्त्री’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून आशातार्इंच्या सुरांची जादू पुन्हा ऐकायला मिळणार आहे. पंकज पडघन याने हे गाणे संगीतबद्ध केले आहे.
आशातार्इंची अळीमिळी गुपचिळी
By admin | Updated: March 18, 2015 23:01 IST