Join us

ऐशचा फर्स्ट लूक

By admin | Updated: March 2, 2016 02:03 IST

ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ चित्रपटातील ऐश्वर्या रॉय बच्चनचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. यात तिने सरबजीतच्या बहीणीची म्हणजेच दलबीर कौरची भूमिका साकारत आहे.

ओमंग कुमार दिग्दर्शित ‘सरबजीत’ चित्रपटातील ऐश्वर्या रॉय बच्चनचा फर्स्ट लुक रिलीज झाला आहे. यात तिने सरबजीतच्या बहीणीची म्हणजेच दलबीर कौरची भूमिका साकारत आहे. सरबजीत सिंग हा पंजाबमधील भिक्कीविंड येथील एक शेतकारी असतो. हे ठिकाण इंडो-पाक बॉर्डरपासून जवळपास ५ किमी अंतरावर आहे. १९९०रोजी तो दारूच्या नशेत बॉर्डर ओलांडून पाकिस्तानमध्ये जातो. त्याला भारतीय गुप्तहेर म्हणून १९९१ मध्ये शिक्षा ठोठावण्यात येते. त्याला २३ वर्षे कोट लखपत जेलमध्ये ठेवण्यात येते. त्याच्या २३ वर्षाच्या जेलमध्ये त्याची बहीण दलबीर कौर त्याला भावापेक्षा जास्त मुलाप्रमाणेच वागवते. केवळ तीन वेळेस तिला त्याला भेटायला मिळते पण त्याला आतून सोडवायचे हे मनात घट्ट करून ती बाहेर पडते. आणि ‘सरबजीत’ हा चित्रपट संपूर्ण तिच्या लढाईचा प्रवास आहे.