Join us

अॅश-अभिषेकमध्ये 'आराध्या'वरून पडली ठिणगी?

By admin | Updated: March 4, 2017 15:17 IST

आराध्या बच्चनच्या करीयरच्या मुद्यावरून ऐश्वर्या-अभिषेकदरम्यान वाद झाल्याचे वृत्त आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - करण जोहरच्या ' ऐ दिल है मुश्किल' चित्रपटातील रणबीर कपूरसोबत ऐश्वर्या राय बच्चनने दिलेल्या इंटीमेट सीन्समुळे तिचा पती आणि अभिनेता अभिषेक बच्चन नाराज झाल्याचे वृत्त गेल्या वर्षी गाजले होते. ऐश्वर्याची बोल्ड भूमिका अभिषेक आणि बच्चन कुटुंबियांना मान्य नव्हती आणि त्यामुळे अॅश-अभिदरम्यान वाद झाल्याची चर्चाही सुरू होती. मात्र त्या दोघांनीही हे वृत्त फेटाळून लावत सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले होते. 
मात्र आता या दोघांमध्ये पुन्हा खटके उडू लागल्याची चर्चा सुरू असून या वादाचे कारण आहे खुद्द त्यांची मुलगी ' आराध्या बच्चन. आराध्याने बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करावे अशी अभिषेकची इच्छा आहे. तिने अभिनय क्षेत्रातील बारकावे शिकून त्यात कौशल्य मिळवावे आणि एक दिवस अतिशय यशस्वी अभिनेत्री बनावे असे अभिषेकचे स्वप्न आहे. पण ऐश्वर्याला मात्र हे बिलकूल पसंत नसून आराध्याने प्रसिद्धीच्या झोतापासून दूर रहावे, असे तिचे मत आहे. मुलीच्या करीअरवरून अॅश- अभिषेकमध्ये वादाची ' ठिणगी' पडल्याचे समजते. मात्र अॅश वा अभिषेकने किंवा बच्चन कुटुंबियांकडून याप्रकरणी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. 
(बुडत्या अभिषेकला अॅश-बिग बींचा आधार)
(अवघे पाऊणशे वयमान... तरी भारतीय महिलांना हवा अमिताभसारखा पती!)
(अमिताभच्या संपत्तीवर श्वेता- अभिषेकचा समान हक्क)
  •  
 
  •  
 
  •