Join us

Birthday Special : बॉलिवूडमधील या अभिनेत्याला आसावरी जोशी देतात यशाचे श्रेय, या अभिनेत्यासोबत केले आहे काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 12:56 IST

आसावरी जोशी यांना ऑफिस ऑफिस या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. ही मालिका त्यांच्या करियरमध्ये अतिशय महत्त्वाची असल्याचे त्या नेहमीच मुलाखतींमध्ये सांगतात.

ठळक मुद्देआसावरी यांना ऑफिस ऑफिस या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे नशीबच पालटले.

आसावरी जोशी यांचा आज वाढदिवस असून त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत देखील आपली जागा निर्माण केली आहे. आसावरी जोशी यांना ऑफिस ऑफिस या मालिकेमुळे खरी ओळख मिळाली. ही मालिका त्यांच्या करियरमध्ये अतिशय महत्त्वाची असल्याचे त्या नेहमीच मुलाखतींमध्ये सांगतात.

आसावरी जोशी यांचा जन्म 6 मे 1965 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.  त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली. रंगभूमीवर काम करत असताना त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी 1986 मध्ये ‘माझं घर माझा संसार’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर ‘एक रात्र मंतरलेली’, ‘गोडी गुलाबी’, ‘बाल ब्रम्हचारी’ अशा काही चित्रपटांमध्ये त्यांनी लहानमोठ्या भूमिका साकारल्या. त्यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या सौंदर्याची नेहमीच चर्चा रंगते.

आसावरी यांना ऑफिस ऑफिस या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचे नशीबच पालटले. या मालिकेत त्यांनी साकारलेली उषा ही भूमिका प्रचंड गाजली. या मालिकेनंतर त्यांना हिंदी मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारायला मिळाल्या.  शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटात देखील त्यांनी काम केले आहे. 

आसावरी जोशी यांना हिंदी इंडस्ट्रीत मिळालेल्या यशाचे श्रेय त्या पंकज कपूर यांना देतात. पंकज कपूर यांच्यासोबत त्यांनी ऑफिस ऑफिस या मालिकेत काम केले होते. 

टॅग्स :पंकज कपूर