बॉलीवूडच्या मोठ्या पडद्यावर नशीब आजमावून झाल्यावर आता अभिनेता आर्य बब्बरने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळविला आहे. नव्याने सुरू होणाऱ्या ‘संकट मोचन महाबली हनुमान’ या मालिकेत आर्य रावणाची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी सध्या तो आपल्या बॉडी आणि लूकवर मेहनत घेतोय. शिवाय, रावणाच्या वेगवेगळ्या कथा आणि संदर्भाचाही अभ्यास करीत असल्याचे आर्यने सांगितले.
आर्य ‘रावण’ साकारणार
By admin | Updated: April 24, 2015 09:30 IST