Join us
Daily Top 2Weekly Top 5

ही गायिका, अभिनेत्री बनलीय सगळ्यांची क्रश, तिच्या सौंदर्यावर झालेत सगळे फिदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 19:08 IST

ही गायिका, अभिनेत्री सगळ्यांची क्रश बनली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही.

ठळक मुद्देगायनाबरोबरच अभिनयातही आर्याने नाव कमावलं आहे. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत.

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाच्या माध्यमातून आर्या आंबेकर हे नाव घराघरात पोहोचले. आर्याला गायनाचे बाळकडू तिच्या घरातूनच मिळाले. आर्याने वयाच्या साडेपाच वर्षांपासून गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. आर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. आर्या सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावत आहे.

सध्या आर्या सगळ्यांची क्रश बनली आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिच्या सौंदर्यावर, आवाजावर सगळेच फिदा आहेत. तिच्या सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट करतात. 

गायनाबरोबरच अभिनयातही आर्याने नाव कमावलं आहे. आर्याने आतापर्यंत अनेक मराठी आणि हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपट आणि नाटकांसाठी गाणी गायली आहेत. विशेष म्हणजे माणिक वर्मा शिष्यवृत्तीही तिने मिळवली आहे. विविध मालिकांसाठीही तिने गाणी गायली आहेत. गायनासह तिने ती सध्या काय करते या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर एंट्री मारली. आर्याचा हा पहिलाच मराठी चित्रपट हिटच्या यादीत सामील झाला होता. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेसोबत आर्याची रुपेरी पडद्यावर जोडी जमली आणि प्रेक्षकांनी त्यांना पसंतीची पावती दिली. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे आर्या लक्ष वेधून घेते.

टॅग्स :आर्या आंबेकर