Join us

टायगर सलमान सोबत हा कलाकार करणार हेरा फेरी

By admin | Updated: March 13, 2017 06:21 IST

दबंग सलमान खानने नुकतेच टुबलाईट चित्रपटाचे शुटींग संपवून टायगर जिंदा है चे शुटींग सुरुवात केली आहे.सलमान व कतरिनाची ऑनस्क्रीन जोडी कायम हिट राहिली आहे

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - बॉलीवुडचा दबंग अभिनेता सलमान खानच्या सुलतान चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रग्गड कमाई करत नवे रेकॉर्ड विस्तापित केले. 25 जून 2017 ला सलमान खानचा टुबलाईट तिकिटखिडकीवर झळकणार आहे. सलमानच्या आगामी टायगर जिंदा है या चित्रपटात अवलिया कलाकार परेश रावल हेरा-फेरी करताना दिसणार आहे. यशराज फिल्मसोबत परेश रावल यांचा हा पहिलाच चित्रपट असून, या चित्रपटात ते एका वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. दिग्दर्शक अब्बास जफर यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. सलमान खान - कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असणाऱ्या टायगर जिंदा है या चित्रपटातून परेश रावल खास भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात सलमान खान एका रॉ एजंटची भूमिका साकारणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. मात्र परेश रावल या चित्रपटात नक्की कोणती भूमिका साकारणार, हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. टायगर जिंदा है चित्रपटातील सलमान खानच्या लूकची चर्चा रंगत असताना परेश रावलच्या एन्ट्रीमुळे चित्रपटाच्या चर्चेत आता आणखी भर पडली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक भूमिका सक्षमपणे पेलणाऱ्या परेश रावल यांच्यासोबत काम करण्यासाठी त्रपटाच्या दिग्दर्शक अब्बास जफर देखील उत्सुक आहे. परेश रावलच्या अभिनयाचा चाहता असल्याचे सांगत अब्बास जफरने परेश यांच्यासोबत काम करण्यासाठी आतुर झाल्याचे सांगितले. यापूर्वी 2011 मध्ये रेडी चित्रपटात परेश रावल आणि सलमान खान एकत्र दिसले होते. सलमानसोबतच्या या चित्रपटात विनोदी भूमिका साकरणारा परेश रावल आगामी चित्रपटात कोणत्या भूमिकेत असणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.दरम्यान, दबंग सलमान खानने नुकतेच टुबलाईट चित्रपटाचे शुटींग संपवून टायगर जिंदा है चे शुटींग सुरुवात केली आहे.सलमान व कतरिनाची ऑनस्क्रीन जोडी कायम हिट राहिली आहे. या जोडीचा 2012 मध्ये आलेला एक था टायगर तुफान हिट झाला होता. टायगर जिंदा है हा याच चित्रपटाचा सीक्वल आहे. टायगर जिंदा है शिवाय कॅटरिनाचा जग्गा जासूस हा चित्रपटही आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात ती रणबीर कपूरसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.