Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘अस्सं सासर सुरेख बाई’च्या कलाकारांची नाशिकला भेट

By admin | Updated: April 21, 2016 01:44 IST

‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘अस्स सासर सुरेख बाई’ व ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मालिकेतील कलाकारांनी नाशिकला भेट देत प्रेक्षकांशी संवाद साधला

‘कलर्स’ मराठी वाहिनीवरील ‘अस्स सासर सुरेख बाई’ व ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ मालिकेतील कलाकारांनी नाशिकला भेट देत प्रेक्षकांशी संवाद साधला. याप्रसंगी अभिनेत्री मृणाल दुसानीस, श्वेता पेंडसे, पंढरीनाथ कांबळे (पॅडी), अनुपमा टाकमोघे आदी उपस्थित होते. विषयप्रधान मालिका आणि दर्जेदार कार्यक्रम यामुळे कलर्स वाहिनीची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन वाहिनीने कलाकारांना घेऊन प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे ठरविले असून त्या अंतर्गत हा दौरा होता. अनुपमा टाकमोघे यांनी यावेळी ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ विषयी सांगितले की, महाराष्ट्रातील मैलामैलांवर बदलणाऱ्या बोलीभाषेचा लहेजा टिपण्याचा प्रयत्न या शोद्वारे केला जात असून गंभीर विषय हलक्याफुलक्या पद्धतीने लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आजवर शोच्या प्रत्येक स्किटमध्ये वेगवेगळे विषय हाताळले जात होते. आता एक विषय घेऊन संपुर्ण शोत सादरीकरण केले जात आहे. यात पाणी, विवाहसंस्था व नातेसंबंध, सायबर गुन्हे यासारखे विषय हाताळले जात आहेत. यावेळी ‘किती सांगायचय मला’, ‘सरस्वती’, ‘तु माझा सांगाती’, ‘कमला’ या मालिकांना प्रेक्षकांचा असलेला प्रतिसाद पाहून वाहिनीला आनंद होत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.