Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन कपूर झाला ट्रोल; नेटिझन्स म्हणाले,‘पानीपत’ही होणार फ्लॉप!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 20:30 IST

तो ‘पानीपत’मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच तो चांगलाच ट्रोल झाला. नेटिझन्सनी चित्रपट फ्लॉप होण्याचे संकेत कमेंटस करताना दिले आहेत. 

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर याने करिअरची सुरूवात सहाय्यक दिग्दर्शकाच्या रूपात ‘कल हो ना हो’ मधून केली. दिग्दर्शनानंतर अर्जुन अभिनयाकडे वळला. एक अभिनेता म्हणून ‘इश्कजादे’ हा त्याचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले. आता मात्र तो ‘पानीपत’मुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. नुकताच तो चांगलाच ट्रोल झाला. नेटिझन्सनी चित्रपट फ्लॉप होण्याचे संकेत कमेंटस करताना दिले आहेत. 

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानीपत’ चित्रपटाची शूटिंग सध्या सुरू आहे. चित्रपटाची शूटिंग सुरू होताच अर्जुनने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. त्यासोबतच लिहिले की, आशुतोष सर आणि आमच्या टीमसोबत एका शानदार प्रवासाची सुरूवात झाली आहे, जी यापूर्वी कधीही झाली नाही. अर्जुनने  हे स्टेटस शेअर करताच  काही फॉलोअर्सने या चित्रपटाबाबत खऱ्या -खोटया गोष्टींची चर्चा सुरू केली. 

सोशल मीडियावर एका युजरने लिहिले की, तू एक फ्लॉप अभिनेता आहेस आणि तुझा चित्रपटही फ्लॉपच होणार आहे. तसेच तुम्ही सगळे जण राजा -राणीसह चित्रपट बनवत आहात. तुम्हाला वाटते की, प्रत्येक चित्रपट हा ‘बाहुबली’ होऊ शकेल. तुम्ही असे काम कधीही करू शकत नाही. त्यासोबतच त्यांनी मलायका अरोरा सोबतच्या नात्यांवरही प्रश्न केला. 

अलीकडे ‘कॉफी विथ करण 6’ या चॅट शोमध्ये बोलताना अर्जुनने अप्रत्यक्षपणे लग्नाचेही संकेत दिलेत. शोचा होस्ट करण जोहरने अर्जुनला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला. यावर मी सिंगल नाही, असे अर्जुन म्हणाला. अर्जुनच्या या खुलाशाने त्याची बहीण जान्हवी कपूर हिलादेखील आश्चर्याचा धक्का बसला. तुझ्या पार्टनरला तुझ्या कुटुंबियासोबत कधी भेटवणार, असे करणने विचारल्यावर, माझ्या कुटुंबासमोर आता मी कबूल केलेच,असे त्याने सांगितले. त्यावर मला आत्ता इथे ही गोष्ट कळली असे जान्हवी म्हणाली होती.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरापानिपतआशुतोष गोवारिकर