Join us

Hotness Overloaded : मलायका अरोराच्या ‘हॉट’ फोटोंवर अर्जुन कपूरची ‘हॉट’ कमेंट!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 16:26 IST

मलायकाने स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करण्याची देर की, अर्जुन कपूरची कमेंट तयार.

ठळक मुद्देअरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.

बॉलिवूडची ‘मुन्नी’ अर्थात मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या त्यांच्या रोमॅन्टिक रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. तसेही एकमेकांची प्रशंसा करण्याची एकही संधी अर्जुन व मलायका सोडत नाहीत. आता हेच बघा ना, मलायकाने स्वत:चे बोल्ड फोटो शेअर करण्याची देर की, अर्जुन कपूरची कमेंट तयार. होय, मलायकाने सोशल मीडियावर स्वत:चे बोल्ड फोटो शेअर केलेत आणि अर्जुन ‘बोल्ड’ झाला.

एका अवार्ड फंक्शनमध्ये मलायका व्हाईट ड्रेस घालून सहभागी झाली. तत्पूर्वी या ड्रेसमधील तिचे काही हॉट फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो पाहिलेत आणि अर्जुन खल्लास झाला. फायर इमोजी टाकत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्यात.

अलिकडे मलायका आणि अर्जुन कपूर यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत आहेत. हे कपल लवकरच विवाहबंधनातही अडकणार असेही मानले जात आहे. नुकताच अर्जुन कपूर मलायकाच्या आई-वडिलांना भेटायला त्यांच्या घरी गेला होता. त्यांचे फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. मलायकाचे वडील अनिल अरोरा सुद्धा या फोटोंमध्ये दिसले होते. या भेटीनंतर मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. पण तूर्तास तरी मलायका व अर्जुनने लग्नाचे संकेत दिलेले नाहीत.  

गत ६ जुनला अर्जुनचा वाढदिवस होता. अर्जुनला बर्थ डे विश करताना, मलायकाने त्याच्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. शिवाय आपले नाते जगजाहिर केले होते. सुरुवातीला मलायका व अर्जुन दोघांनीही आपले नाते जगापासून लपवून ठेवले. पण अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अगदी बिनधास्त अर्जुनसोबत फिरू लागली.

टॅग्स :मलायका अरोराअर्जुन कपूर