बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने नववर्षाच्या सुरुवातीलाच चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. अरिजीतने पार्श्वगायन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे लाखो चाहते निराश झाले आहेत. अरिजीतने प्बेबॅक सिंगिग मधून निवृत्ती घेतल्यानंतर सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. बॉलिवूडमधील दबावामुळे त्याने निवृत्ती घेतल्याचं बोललं जात आहे. बॉर्डर २ मध्ये अरिजीतला जबरदस्तीने गाणं गायला लावल्याने त्याने निवृत्तीचा निर्णय घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता बॉर्डर २चे निर्माते भूषण कुमार यांनी मौन सोडलं आहे.
अरिजीत सिंहबाबत लागलेल्या आरोपांवर भूषण कुमार यांनी एचटी सिटीशी बोलताना उत्तर दिलं आहे. "या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. तुम्ही कृपया अरिजीतला फोन करून याबाबत विचारा... हे सगळं बकवास आहे", असं भूषण कुमार म्हणाले. अरिजीतने नुकत्याच रिलीज झालेल्या बॉर्डर २ सिनेमातील घर कब आओगे या गाण्याला आवाज दिला आहे. हे गाणं बॉर्डरमधील चिठ्ठी आई है या गाण्याचा रिमेक आहे. या गाण्यावरुन अरिजीत नाराज होता. पण तरीदेखील अरिजीतला हे गाणं गायला लावल्याचं म्हटलं गेलं होतं.
अरिजीतने आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन प्लेबॅक सिगिंगमधून निवृत्ती घेत असल्याचं म्हटलं होतं. पोस्ट शेअर करत त्याने याबाबत चाहत्यांना माहिती दिली होती. "नमस्ते, सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. इतकी वर्षे श्रोते म्हणून मला जे प्रेम दिले, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे. मला हे सांगताना आनंद होत आहे की, आता मी इथून पुढे 'प्लेबॅक सिंगर' म्हणून कोणतेही नवीन काम घेणार नाहीये. मी हा प्रवास इथेच थांबवत आहे. हा प्रवास अत्यंत सुंदर होता", असं त्याने म्हटलं होतं.
Web Summary : Amidst Arijit Singh's playback singing retirement buzz, 'Border 2' producer Bhushan Kumar denies forcing him to sing. Kumar dismisses claims as baseless, urging confirmation from Arijit himself. Arijit's retirement announcement sparked debate about Bollywood pressure.
Web Summary : अरिजीत सिंह के पार्श्व गायन से संन्यास की खबरों के बीच, 'बॉर्डर 2' के निर्माता भूषण कुमार ने उन्हें गाने के लिए मजबूर करने से इनकार किया। कुमार ने दावों को निराधार बताया और अरिजीत से पुष्टि करने का आग्रह किया। अरिजीत की सेवानिवृत्ति की घोषणा ने बॉलीवुड के दबाव के बारे में बहस छेड़ दी।