Join us

आर्चीच्या आईने ‘सैराट’आधी ‘फँड्री’तही केले होते काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2016 00:31 IST

मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या ‘सैराट’मधील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले

मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचणाऱ्या ‘सैराट’मधील सर्वच कलाकारांचे प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. ‘सैराट’मधील प्रत्येक कलाकाराचा अभिनय नैसर्गिक असाच होता. आर्ची, परश्या, बाळ्या, सल्ल्या, आनी या पात्रांनी तर लोकांच्या मनात घर केलेच. मात्र, त्याचबरोबर आर्चीच्या आईची भूमिकाही अभिनेत्री भक्ती चव्हाण यांनी सुंदर रेखाटली. मूळच्या उस्मानाबाद येथील भक्ती चव्हाण या सध्या पुण्यात राहत आहेत. मंजुळे यांच्या ‘सैराट’बरोबर त्यांनी ‘फँड्री’तही काम केले होते. ‘फँड्री’तही त्यांनी पाटलिणीची भूमिका केली होती. ‘फँड्री’नंतर त्यांनी ‘कोकणस्थ’, ‘हॅपी जर्नी’, ‘हेल्पलाइन’, ‘झाड’, ‘उणीव’ यांसारख्या चित्रपटांतून अभिनयाची चुणूक दाखवली. ‘फँड्री’तील कामामुळे ‘सैराट’मध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली, असे त्या सांगतात.