Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॅन्जोमध्ये आर्चीचा कॅमियो?

By admin | Updated: May 23, 2016 02:55 IST

‘सैराट’ सिनेमाच्या बॉक्स आॅफिसवरील झिंगाट कलेक्शनमुळं आर्ची फेम रिंकू राजगुरू आणि परश्या - प्रशांत ठोसरला सुस्साट प्रसिद्धी मिळतेय. प्रत्येकाच्या तोंडावर आर्ची आणि परश्याचं नाव आहे.

‘सैराट’ सिनेमाच्या बॉक्स आॅफिसवरील झिंगाट कलेक्शनमुळं आर्ची फेम रिंकू राजगुरू आणि परश्या - प्रशांत ठोसरला सुस्साट प्रसिद्धी मिळतेय. प्रत्येकाच्या तोंडावर आर्ची आणि परश्याचं नाव आहे. पहिल्याच सिनेमाला मिळालेला यशामुळे फॅन्स, सेलीब्रिटींकडून दोघांचं कौतुक होतंय. सैराटमधील भूमिकेसाठी रिंकू राजगुरूला राष्ट्रीय पुरस्कारही मिळालाय. आता याच आर्चीला रितेश देशमुखच्या सिनेमाची लॉटरी लागल्याची चर्चा सुरू झालेय. सैराटनंतर आता आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचा कॅमियो रितेशच्या आगामी ‘बॅन्जो’ सिनेमात पाहायला मिळू शकतो. सैराट पाहून अभिनेता रितेश देशमुखनं ट्विटरवर सिनेमा आणि कलाकारांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. यानंतरच बॅन्जो सिनेमातील या कॅमियोसाठी रिंकूची वर्णी लागल्याची चर्चा आहे. ‘बॅन्जो’ या सिनेमाचं दिग्दर्शन रवी जाधव यांनी केलंय. सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असलं तरी आता हा रिंकूचा बॅन्जो सिनेमातील कॅमियो कसा असेल याबाबतची उत्सुकता लागलीय.