Join us

AR Rahman: जय हो! सूरांच्या बादशाहचा सन्मान, कॅनडातील रस्त्याला ए.आर.रहमान यांचं नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:04 IST

सूरांचा बादशाह आणि दिग्गज संगीतकार ए.आर.रहमान यांचा कॅनडामध्ये मोठा सन्मान करण्यात आला आहे

सूरांचा बादशाह आणि दिग्गज संगीतकार ए.आर.रहमान यांचा कॅनडामध्ये मोठा सन्मान करण्यात आला आहे. त्यांना सन्मानित करण्यासाठी कॅनडातील एका रस्त्याला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. समोर आलेल्या माहितीनुसार कॅनडातील मरखम शहरातील एका रस्त्याचं नाव बदलून ए.आर.रहमान असं करण्यात आलंय.

दरम्यान, ए.आर.रहमान यांनी स्वत: ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. तसंच आपल्या ट्वीटसह त्यांनी तिकडच्या महापौरांसह असलेले काही फोटोही शेअर केले आहेत. मरखम शहर, फ्रँक स्कारपिटी आणि कॅनडाच्या नागरिकांनी दिलेल्या या सन्मानाप्रति मी आभारी आहे, असं ट्वीटही रहमान यांनी केलंय. ए.आर.रहमान सध्या अभिनेते चियान विक्रम यांच्या कोब्रा या चित्रपटात व्यस्त आहेत. हा चित्रपट ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. यानंतर ते मणिरत्नम यांच्या चित्रपटातही संगीत देणार आहेत. यासोबतच ते दिग्दर्शनातही पदार्पण करणार असून पहिला चित्रपट मस्कवर ते काम करत आहेत.

टॅग्स :ए. आर. रहमानकॅनडासंगीत