Join us

अप्पीच्या बापूंनाही लागलं व्हायरल ट्रेंडचं वेड; 'होगा तुमसे प्यारा कौन'वर केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 16:34 IST

Santosh patil: अप्पीच्या बापूंनी 'होगा तुमसे प्यारा कौन' या ट्रेंडिंग गाण्यावर रील केलं असून त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे.

सोशल मीडियावर दररोज असंख्य ट्रेंड व्हायरल होत असतात. हे ट्रेंड सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण फॉलो करतो. यामध्येच सध्या नेटकऱ्यांमध्ये 'सामी' आणि 'होगा तुमसे प्यारा कौन' ही दोन गाणी तुफान ट्रेंड होतायेत. आतापर्यंत अनेक कलाकारांनी त्याच्यावर रिल्सही शेअर केलं आहे. यामध्येच आता या ट्रेंडची भुरळ अप्पी आमची कलेक्टर फेम बापुंना पडली आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेतील अनेक कलाकार नवनवीन ट्रेंड फॉलो करतांना दिसतात. विशेष म्हणजे यात अप्पीचे बापू सुद्धा मागे नाहीत. सध्या सोशल मीडियावर त्यांचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत अभिनेता संतोष पाटील यांनी अप्पीच्या वडिलांची म्हणजेच बापुंची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे त्यांची ही भूमिका सध्या लोकप्रिय ठरत आहे. संतोष पाटील हे कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे ते नवनवीन व्हिडीओ, फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

दरम्यान, संतोष यांनी  'होगा तुमसे प्यारा कौन' या ट्रेंडिंग गाण्यावर रील केलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजत आहे. इतकंच नाही तर त्यांचा हा नवा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेताझी मराठी