Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनुष्कावरील प्रेमाची विराटकडून जाहीर कबुली

By admin | Updated: November 11, 2014 00:10 IST

श्रीलंकेविरुद्ध हैदराबाद येथे रविवारी झालेल्या सामन्यात विराटने असे वर्तन केले की, भारतीय खेळाडू मैदानावर तसे करण्यास धजावत नाहीत.

श्रीलंकेविरुद्ध हैदराबाद येथे रविवारी झालेल्या सामन्यात विराटने असे वर्तन केले की, भारतीय खेळाडू मैदानावर तसे करण्यास धजावत नाहीत. भारतीय प्रेक्षकांसाठीही ते  दृश्य दुर्मिळच होते. आपले अर्धशतक पूर्ण होताच विराटने प्रेक्षकांच्या अभिवादनाचा जल्लोषात स्वीकार केला.  प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या अभिनेत्री अनुष्का शर्माने उभे राहून टाळ्या वाजवत विराटचे कौतुक केले. त्याचवेळी विराटने हेल्मेट काढून अनुष्काला बॅटच्या आधारे ‘फ्लाईंग किस’ केले. दोघांच्या प्रेमाचे दर्शन अशा प्रकारे घडल्यानंतर स्टेडियमवर टाळ्यांचा कडकडाट झाला. विराट आणि अनुष्का यांच्या नातेवाईकांनी काही दिवसांपूर्वीच एकमेकांची भेट घेतली होती. दोघांचा साखरपुडा लवकरच होणार असल्याची चर्चा आता रंगली आहे. विराटने स्टेडियमवर जाहीरपणो प्रेमाची कबुली दिल्यानंतर या चर्चेत तथ्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.