Join us

अनुष्का शर्माने गेल्यावर्षी कमावले इतके कोटी, आकडा वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2020 19:08 IST

प्रत्येक सिनेमासाठी सुमारे 12 ते 15 कोटी रुपये घेते. तसेच स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे, ज्याची सुरुवात तिने आपल्या भावासोबत 2014 मध्ये केली होती.

सेलिब्रिटी मंडळींवर रसिक जीव ओवाळून टाकतात. रसिकांचं या सेलिब्रिटींवर मनापासून प्रेम असतं. रसिकांच्या या प्रेमामुळेच सेलिब्रिटी मंडळी त्यांच्या करिअरमध्ये कोट्यवधींची कमाई करतात. दर महिन्याला सेलिब्रिटी गलेलठ्ठ कमाई करतात. करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना होणा-या कमाईचा आकडा पाहून अनेकांना धक्काही बसतो. त्यांच्या कमाईच्या वाट्यात सिनेमातून मिळणा-या मानधनाचा वाटा हा मोठा असतो. 

त्यातच कलाकार सिनेमासाठी किती मानधन घेतात हे जाणून घेण्याची रसिकांना उत्सुकता असते. त्यात बॉलिवूडमधील अनेक कलाकार आजघडीला कोटींची मानधन घेतात. अभिनेत्यांप्रमाणे अभिनेत्रीसुद्धा मागे नाहीत. या अभिनेत्रींमध्ये कमाईच्या बाबतीत अभिनेत्री अनुष्का शर्मा आघाडीवर आहे. एका सिनेमासाठी घेत असलेले मानधनाचा आकडा वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे. प्रत्येक सिनेमासाठी सुमारे 12 ते 15 कोटी रुपये घेते. तसेच स्वत: चे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे, ज्याची सुरुवात तिने आपल्या भावासोबत 2014 मध्ये केली होती. 

अनुष्का मान्यवर, मायन्ट्रा, श्याम स्टील, रजनीगंधा, कॉक्स अँड किंग्ज, निवा, पॅन्टेन, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, गुगल पिक्स, ईएल 18 अशा ब्रँडसाठी जाहिरात करते. सिनेमा, जाहीरातींच्या माध्यमातून  अनुष्का शर्माने गेल्या वर्षी सुमारे 28.67 कोटी रुपये कमावले असल्याची माहिती समोर आली आहे.

टॅग्स :अनुष्का शर्मा