Join us

अनुष्काचा ओरडा खाणारा तरुण बॉलिवूड कलाकार, शाहरुखसोबत केलंय काम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 10:32 IST

अरहान सिंहने नंतर सोशल मीडियातून अनुष्कालाही चांगलेच सुनावले. त्याच्या आईनेही अनुष्काला छापले. 

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत ती रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका तरुणाला रागावताना दिसली. विराट ने हा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला. अरहान सिंह असं या तरुणाचं नाव असून नंतर त्याने सोशल मीडियातून अनुष्कालाही चांगलेच सुनावले. त्याच्या आईनेही अनुष्काला छापले. 

या प्रकरणामुळे अरहान हे नाव चांगलंच चर्चेत आलं. पण हे नाव इंडस्ट्रीसाठी नवीन नाहीये. हा अरहान कोण आहे हे कळाल्यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. अरहान याने बालकलाकार म्हणून अनेक बॉलिवू़ड सिनेमांमध्ये काम केलं आहे. 

अरहानने शाहरुख खानसोबत 'इंग्लिश बाबू देसी मेम' या सिनेमात काम केलं आहे. त्याने शाहरुखसोबतचा एक फोटोही त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. अरहान बॉलिवूडमध्ये सनी या नावाने लोकप्रिय आहे. त्याने शाहिद कपूरच्या पाठशाला सिनेमातही काम केलं होतं. 

सध्या अरहान एक इव्हेंट कंपनी चालवतो आणि सोबतच फॅशन डिझायनरही आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अरहानने शेखर सुमन यांच्या 'देख भाई देख' या मालिकेतही काम केलं आहे.

दरम्यान, अनुष्काने त्याच्यासोबत केलेला व्यवहार योग्य असला तरी त्याला यामुळे टिकेचा सामना करावा लागत आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माबॉलिवूडसोशल मीडियासोशल व्हायरलविराट कोहली