Join us

अनुष्का आता फेसबुकवर

By admin | Updated: November 15, 2014 00:33 IST

मायक्रोब्लॉगिंग साईट टि¦टरनंतर अनुष्का शर्मा आता फेसबुकवरही आली आहे. अनुष्का सध्या ‘पीके’ या चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे.

 मायक्रोब्लॉगिंग साईट टि¦टरनंतर अनुष्का शर्मा आता फेसबुकवरही आली आहे. अनुष्का सध्या ‘पीके’ या चित्रपटाच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. फेसबुकवर अकाऊंट ओपन करण्यापूर्वी अनुष्काने तिच्या चाहत्यांसाठी एका ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धकांनी नावीन्यपूर्ण कव्हरफोटो डिझाईन करून ते अनुष्काला पाठवायचे होते, त्यापैकी एका कव्हरफोटोची निवड करून ती तिच्या अधिकृत फेसबुक पेजवर कव्हरफोटो म्हणून तो फोटो वापरणार होती; पण तिने आयोजित केलेल्या या स्पर्धेला एवढा प्रतिसाद मिळाला की कोणाची निवड करावी, असा प्रश्न तिला पडला. अनुष्काने टि¦ट केले की, ‘मी विचारात पडले आहे की कोणत्या फोटोची निवड करावी. सर्वच एन्ट्रीज उत्कृष्ट आहेत. तुम्ही टॅलेंटेड आहात.’