Join us

अनुष्का भेटली विराटच्या फॅमिलीला

By admin | Updated: June 10, 2016 08:18 IST

विराट-अनुष्का या लव्हबर्ड्सच्या रिलेशनमध्ये काहीतरी खटके उडाल्याच्या बातम्या मागच्या आठवड्यात आल्या होत्या

विराट-अनुष्का या लव्हबर्ड्सच्या रिलेशनमध्ये काहीतरी खटके उडाल्याच्या बातम्या मागच्या आठवड्यात आल्या होत्या, पण नुकतेच अनुष्काने विराटच्या फॅमिलीसोबत क्वालिटी टाइम घालविल्याचे दिसून आले. त्याचे झाले असे की, अनुष्का सध्या दिल्लीमध्ये सलमानसोबत ‘सुल्तान’चे शूटिंग करत आहे. शूटिंग होऊन पॅकअप होताच, अनुष्काने धावतपळत विराटचे घर गाठले. त्याच्या घरच्यांशी गप्पा-टप्पा मारून ही जोडी विमानतळावर गेल्याचे अनेकांनी पाहिले. तेथून ते नेमके कुठे गेले, हे निश्चित सांगता येणार नाही, परंतु अनुष्काच्या ‘पिल्लाउरी’ चे शूटिंग सध्या चंदिगड येथे सुरू असल्याने, ते दोघे तिथे गेले असावेत, असे वाटते.