गेल्या आठ वर्षांपासून अनुष्का शर्मा ही बॉलीवूडमध्ये आपले भक्कम स्थान निर्माण करून बसली आहे. विविध आव्हानात्मक भूमिका, चार्मिंग लुक्स, बिंधास अॅटीट्यूट, स्टाईल स्टेटमेंट्स यांच्यामुळे अनुष्का नेहमीच चर्चेत असते. सध्या ती स्वत:च्या होम प्रोडक्शनअंतर्गत ‘फिलौरी’ हा चित्रपट साकारत आहे. या चित्रपटाची ती अभिनेत्री आणि निर्माती दोन्हीही आहे. या चित्रपटाच्या सेटवर तिला भेटण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड विराट कोहली आला. त्याने तिच्यासोबत थोडा वेळ घालवला. विराटने एक कुल सेल्फी देखील बरादरी पॅलेस येथे काढला आहे. मध्यंतरी, ते दोघे वेगळे होण्याच्या विचारात होते, मात्र त्यांच्या प्रेमाने त्यांना पुन्हा एकत्र आणले आहे.
सेटवर अनुष्काला भेटला विराट
By admin | Updated: June 13, 2016 02:52 IST