Join us

बॉयफ्रेन्डसोबत रोमॅन्टिक झाली अनुषा दांडेकर; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 11:30 IST

अभिनेत्री शिबानी दांडेकर एकीकडे फरहान अख्तरच्या प्रेमात आंकठ बुडालीय. दुसरीकडे शिबानीची बहीण अनुषा दांडेकर ही करण कुंद्राच्या प्रेमात वेडी झालीय.

ठळक मुद्देअनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे.

अभिनेत्री शिबानी दांडेकर एकीकडे फरहान अख्तरच्या प्रेमात आंकठ बुडालीय. दुसरीकडे शिबानीची बहीण अनुषा दांडेकर ही सुद्धा करण कुंद्राच्या प्रेमात वेडी झालीय. अनुषा दांडेकरकरण कुंद्रा दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. ताज्या फोटोत दोघांचीही केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. अनुषा व करण दोघेही सध्या व्हॅकेशनवर आहेत. समुद्राकाठी वेळ घालवणे अनुषा व करणला आवडते. समुद्राकाठी बसून समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकणे हा दोघांचाही आवडता छंद आहे. त्यामुळेच दोघांचेही सोशल अकाऊंट व्हॅकेशनच्या फोटोंनी भरलेले आहे.

करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकर हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची केमिस्ट्री खूपच छान आहे. गेल्या काही वषार्पासून अनुषा आणि करण एकमेकांना डेट करत आहेत. दोघांचे बॉडिंग, दोघांचे एकमेकांवरचे असलेले प्रेम वेळोवेळी पाहायला मिळते.

अनुषाच्या प्रेमात पडण्याआधी करण कुंद्रा अनेक वर्षे कृतिका कामराच्या प्रेमात होता. ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती.

ओळखीचे मैत्रीत आणि मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडत असे. पण ‘कितनी मोहोब्बत है’ ही मालिका संपल्यानंतर काहीच महिन्यात त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

कृतिकानंतर करण अनुषाच्या प्रेमात पडला. अनुषा दांडेकर हिच्याबद्दल सांगायचे झाल्यास ती इंडो-ऑस्ट्रेलियन एमटीव्ही वीजे आहे. सोबत गायिका अशीही तिची ओळख आहे. अनुष्काचा जन्म ऑस्ट्रेलियातल्या सिडनीमध्ये झाला. देल्ही बेली, सिटी ऑफ गोल्ड आणि एंथोनी कौन है सारख्या चित्रपटात तिने अभिनय केला आहे.

टॅग्स :अनुषा दांडेकरकरण कुंद्राशिबानी दांडेकरफरहान अख्तर