Join us

ओळखलंत का? रविंद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता, फर्स्ट लुक केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 12:16 IST

अभिनेत्याच्या करिअरमधील 538 वा सिनेमा

अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) बॉलिवूडमधील सर्वात अनुभवी कलाकार आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये दिलेले एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आणि त्यातील त्यांचा अभिनय सर्वकाही सांगून जातो. 'सारांश' मधील त्यांची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. आता अनुपम खेर आणखी एक स्पेशल व्यक्तिरेखा साकारण्याच्या तयारित आहेत. व्हिडिओ शेअर करत त्यांनी ही माहिती दिली आहे. तसंच हा त्यांचा 538 वा सिनेमा आहे.

रविंद्रनाथ टागोर यांच्या भूमिकेत दिसणार अनुपम खेर

कवी आणि गुरुदेव रविंद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांच्या जीवनावर सिनेमाची  घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनुपम खेर हे रविंद्रनाथ टागोर यांची व्यक्तिरेखा साकारणार आहेत. त्यांनी आपला फर्स्ट लुक शेअर केला आहे. यामध्ये त्यांना ओळखणंही कठीण आहे. पांढरे केस, लांब दाढी, चेहऱ्यावर उदासीन भाव, काळा सदरा असा एकंदर त्यांचा लुक आहे. खेर यांनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, 'माझ्या ५३८ व्या सिनेमा गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारण्याचं सौभाग्य मला मिळालं आहे. लवकरच अधिक माहिती देऊ.'

अनुपम खेर यांचा हा फर्स्ट लुक पाहून चाहतेही अवाक झालेत. अगदी हुबेहुब कवी रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखाच लुक त्यांनी केला आहे. रविंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय होते ज्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांनी भारताचे राष्ट्रगीत लिहिले आहे. त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी लिहिले आहेत ज्याला रविंद्रसंगीत नावाने ओळखलं जातं. अनुपम खेर यांना या भूमिकेत बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :अनुपम खेररवींद्रनाथ टागोरबॉलिवूडसिनेमा