Join us
Daily Top 2Weekly Top 5

मेरे प्यारे दोस्त! सतीश कौशिक यांच्या जन्मदिनानिमित्त अनुपम खेर यांची पोस्ट; म्हणाले, 'आज की शाम..'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 08:56 IST

सतीश कौशिक यांच्या आठवणीत अनुपम खेर भावूक

'मिस्टर इंडिया' चे कॅलेंडर अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचं ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. आज त्यांच्या जन्मदिनानिमित्त अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) भावूक झाले आहेत. दोघांची मैत्री अतिशय घट्ट होती. प्रत्येक वाढदिवसाला दोघंही एकमेकांसोबत असायचे. आज सतीश कौशिक नाहीत तरी त्याचा वाढदिवस साजरा करणार असं अनुपम खेर म्हणाले आहेत. सतीश कौशिक यांच्या आठवणीत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे.

9 मार्च रोजी होळीच्या रंगपंचमीच्या दुसऱ्याच दिवशी सतीश कौशिक यांचं निधन झालं. त्यांचं व्यक्तिमत्व दिलखुलास होतं. त्यांचा जिगरी दोस्त अनुपम खेर यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'माझा प्रिय मित्र सतीश कौशिक! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आज बैसाखीच्या दिवशी तू ६७ वर्षांचा झाला असता.मात्र तुझ्या आयुष्याच्या ४८ वर्षापर्यंत मला तुझा वाढदिवस साजरा करण्याचं सौभाग्य मिळालं. म्हणूनच मी असं ठरवलं आहे की आज संध्याकाळी तुझा वाढदिवस धडाक्यात साजरा करण्याचा प्रयत्न करु. शशि आणि वंशिकाच्या बाजूची जागा रिकामी असेल. ये मित्रा आम्हाला हा दिवस साजरा करताना बघ. सतीश कौशिक नाईट विथ म्युझिक, लव्ह अँड लाफ्टर!'

सतीश कौशिक यांची एक मोठा स्टुडिओ बनवण्याची इच्छा होती. मात्र त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. आता त्यांचा पुतण्या निशांत ही इच्छा पूर्ण करणार असल्याचं त्याने सांगितलं. निशांत यांनीच सतीश कौशिक यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला होता.

टॅग्स :अनुपम खेरसतीश कौशिक