Join us
Daily Top 2Weekly Top 5

अन्नू मलिक पडला आहे या मालिकेच्या प्रेमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 12:44 IST

दिल्ली ऑडिशन दरम्यान जेव्हा अन्नू मलिकच्या एका आवडत्या मालिकेच्या गायकाने त्याच्यासमोर ऑडिशन दिले तेव्हा अन्नू मलिकला खूप आनंद झाला.

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉल 10 कार्यक्रमाला सात जुलैपासून सुरुवात झाली आहे आणि यंदाच्या सिझनला देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मनीष पॉल या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे तर विशाल दादलानी, अन्नू मलिक आणि नेहा कक्कड हे जबरदस्त त्रिकुट परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आपल्या अनोख्या शैलीमुळे आणि विलक्षणपणामुळे हे तिघे जण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत आहेत. ‘मौसम म्युझिक का’ असे थीम असलेल्या या कार्यक्रमाने आपल्या सांगीतिक प्रवासाच्या माध्यमातून आपली जादू पसरवण्याची हमी दिलेली आहे आणि त्यात फक्त स्पर्धकांसाठीच नाही तर परीक्षकांसाठी देखील सरप्राईज आहेत.दिल्ली ऑडिशन दरम्यान जेव्हा अन्नू मलिकच्या एका आवडत्या मालिकेच्या गायकाने त्याच्यासमोर ऑडिशन दिले तेव्हा अन्नू मलिकला खूप आनंद झाला. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘मेरे साई’ या लोकप्रिय मालिकेचे शीर्षक गीत गाणारा जयदीप हा 10 व्या सत्रासाठी ऑडिशन देणार्‍या कव्वाली गटात होता. अन्नू मलिकने ‘मेरे साई’ बाबत आपले विचार सांगितले. त्याने सांगितले की, त्याला आणि त्याच्या आईला ही मालिका खूप आवडते आणि अबीर सूफीला साई बाबांच्या भूमिकेत पाहून ते भारावून जातात. त्याचे शीर्षक गीत खूप छान म्हटलले आहे, जे मनाचा ठाव घेते.जयदीपसाठी तो दिवस खूपच चांगला होता. त्या दिवशी त्याला अन्नू मलिक कडून खूप कौतुक तर मिळालेच शिवाय आपल्या गाण्याचा आणखी एक चाहता विशाल दादलानीच्या रूपात मिळाला. विशाल त्याच्या गाण्याने इतका प्रभावित झाला की त्याने त्याचा व्यक्तिगत संपर्क क्रमांक मागून घेतला. याविषयी जयदीप सांगतो, “हा माझ्यासाठी खूपच चांगला दिवस होता. कारण मला मेरे साई मधील गीताबद्दल अन्नू मलिक यांनी खूप कौतुक केले. इतक्या मोठ्या संगीत दिग्दर्शक आणि गायकाने माझ्या कामाचे कौतुक करणे हे माझ्यासाठी खूप खास आहे. इंडियन आयडॉल 10 मधील नव्या प्रवासाची मी आतुरतेने वाट बघतो आहे.”

टॅग्स :इंडियन आयडॉलमेरे साई मालिकाअन्नू मलिक