Join us
Daily Top 2Weekly Top 5

एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायकाची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 19:54 IST

तिचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे.

 अनेक स्टारकिड्स आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतात.  सारा, जान्हवी, अनन्या आणि आता शाहरुख खानची मुलगी सुहाना सुद्धा बॉलिवूडमध्ये आपला डेब्यू करण्यास सज्ज झाली आहे.

जान्हवी सारा इतकीच संगीतकार आणि गायक अनू मलिकची मुलगी अदा मलिकही तेवढीच सुंदर आहे. अदा सोशल मीडियावर खूप अ‍ॅटिव्ह असते. तिचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोईंग आहे. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्ससोबत संपर्कात असते.

अदा न्यूयॉर्कमध्ये फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेते आहे. अदाने डिझायन केलेले कपडे ती नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. .अदा खूप चांगली डान्सर आहे. अदा बॉलिवूडच्या इव्हेंट आणि पार्टीच्या ठिकाणी अनेकवेळा स्पॉट होते. अदा अनु आणि अंजू मलिक यांची छोटी मुलगी आहे.

24 वर्षांची अदा खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. अदाच्या मोठ्या बहिणीचे नाव अनमोल मलिक आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून अदा आणि अनमोल मलिक बॉलिवूडमध्ये एंट्री घेणार असल्याची चर्चा आहे. पण यात किती तथ्य आहे हे आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये नक्की कळेल.  

टॅग्स :अनु मलिक