ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पहिल्यांदाच एका चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. अण्णा हजारे यांनी गेल्या ५० वर्षांत एकही चित्रपट पाहिलेला नाही. पण विश्व विधाता श्रीपाद वल्लभ या चित्रपटात ते पहिल्यांदाच झळकणार आहेत. या चित्रपटात एका भजनाचे सादरीकरण करायचे असल्याने अण्णा हजारे यांनी या चित्रपटाला होकार दिला. यात अण्णा हजारेंसोबतच सीए गोविंदप्रसाद मुंदडाही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सीए गोविंदप्रसाद मुंदडा हे जालनातील प्रसिद्ध सीए असून, या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच राळेगणसिद्धी येथे झाले. या चित्रपटात सुरेश वाडकर यांनी गाणी गायले असून, अमृता फडणवीस यांनीदेखील एक स्तोत्र भजन यात गायले आहे.
अण्णा हजारे चित्रपटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2016 03:23 IST