Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंकिता लोखंडेने चाहत्यांसोबत शेअर केली गुडन्यूज, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

By गीतांजली | Updated: October 9, 2020 14:58 IST

अंकिताने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अंकिता लोखंडेच्या वडिलांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. वडिल घरी पतरल्यावर अंकिताने एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. अंकिताने आई-वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आपल्या पोस्टमध्ये वडिलांची काळजी घेतल्याबद्दल तिने हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. अंकिताने मात्र तिचे वडील कोणत्या आजाराशी झुंज देत आहेत याचा उल्लेख केलेला नाही.

अंकिताने लिहिले, पापा हॉस्पिटलमधून घरी परतले आहे. तुमच्या चांगल्या आरोग्याशिवाय कोणतीही गोष्ट मला इतका आनंद देऊ शकत नाही.मी तुमची बिनशर्त आणि नेहमी काळजी घेण्याचे वचन देते.प्रार्थना आणि तुमच्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार. चांगली काळजी घेतल्याबद्दल डॉक्टर आणि स्टाफची मी आभारी आहे. 

डॉटर्स डे च्या दिवशी अंकिताने वडिलांचा हॉस्पिटलच्या बेडवरचा फोटो शेअर केला होता. या फोटोसोबत अंकिताने एक कॅप्शनसुद्धा लिहिले होते. ''माझे आई आणि वडील माझ्यासाठी किती महत्त्वाचे आहेत हे मला शब्दांत सांगणे कठीण आहे. मी आज हे काही आहे ते केवळ तुमच्यामुळेच. मला तुमची मुलगी असल्याचा अभिमान आहे. तुम्ही लवकर बरे होऊन घरी या.'' 

टॅग्स :अंकिता लोखंडे