Join us
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुड्याच्या बातम्यांनी वैतागली अनुष्का

By admin | Updated: November 17, 2014 01:51 IST

क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतच्या ‘अफेअर’मुळे दररोज येणाऱ्या बातम्यांनी अभिनेत्री अनुष्का शर्मा जाम वैतागली आहे. विराट आणि अनुष्का यांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या काहींनी दिल्या आहेत

क्रिकेटपटू विराट कोहलीसोबतच्या ‘अफेअर’मुळे दररोज येणाऱ्या बातम्यांनी अभिनेत्री अनुष्का शर्मा जाम वैतागली आहे. विराट आणि अनुष्का यांचा साखरपुडा झाल्याच्या बातम्या काहींनी दिल्या आहेत, तर काहींनी त्यांचे लग्नही लावून दिले आहे, अशा प्रकारच्या बातम्यांनी त्रस्त झालेल्या अनुष्काने आता उत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यासाठी तिने ‘फेसबुक’चा लिलया वापर केला आहे. ‘माझा साखरपुडा झालेला नसून, सध्या तरी तो होण्याची शक्यता कमीच आहे,’ असे तिने म्हटले आहे. माझ्याबाबतीत अनेक अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळेच फेसबुकच्या माध्यमातून तिने तसे नसल्याचे स्पष्ट केले आहे.