Join us

'ॲनिमल' मधील 'त्या' सीनवेळी रडूच येईना! रणबीरने कशी केली मदत? तृप्ती डिमरीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:41 IST

कोणता होता तो सीन माहितीये का?

२०२३ मध्ये रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाने ९०० कोटी कमावले. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या सिनेमावर बरीच टीकाही झाली तरी लोकांनी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघितला. याचे आणखी २ पार्टही येणार आहेत. सिनेमात रणबीर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री तृप्ती डिमरीच्या (Tripti Dimri) इंटिमेट सीन्सचीही खूप चर्चा झाली. दरम्यान नुकतंच एका मुलाखतीत तृप्तीने शूटदरम्यानचा एक किस्सा सांगितला. एका सीनवेळी तिला रडायला येतच नव्हतं तेव्हा रणबीरने तिची कशी मदत केली हे तिने सांगितलं. 

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती डिमरी म्हणाली, "सिनेमात माझ्या कन्फेशनचा एक सीन आहे. ज्यात मी रणबीरसमोर माझा खरा हेतू काय होता हे सांगते. त्या सीनचं मला खूप दडपण आलं होतं. यामुळे मला माझे वाक्यही आठवत नव्हते. तसंच तेव्हा मी दुसऱ्या सिनेमाचंही शूट करत होते त्यामुळे माझी झोपही नीट झाली नव्हती. ॲनिमलमध्ये माझा तो मोनोलॉग होता आणि वाक्य आठवण्यासाठी माझा स्ट्रगलच सुरु होता. इतर वेळी मला सीनसाठी लगेच रडायला यायचं पण त्या सीनमध्ये रणबीरसमोर मला जमतच नव्हतं."

ती पुढे म्हणाली, "रणबीर खूपच सपोर्टिव्ह आहे. त्याने कोणतीही तक्रार न करता मला सांभाळून घेतलं. त्याला माझा चाललेला संघर्ष दिसला आणि तो म्हणाला, 'तृप्ती, कोणाचा शॉट आधी घ्यायचा? माझा की तुझा क्लोज घ्यायचा? तू सांग. आपण तसाच सीन करु. रणबीर दिग्दर्शकासारखा विचार करतो. रणबीर आणि संदीप वांगा दोघांनी मला हे जाणवूही दिलं नाही की माझ्यामुळे वेळ वाया जात आहे."

ॲनिमल नंतर तृप्ती डिमरीचं नशीबच पालटलं. नंतर तिचे 'बॅड न्यूज' आणि 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' हे सिनेमे रिलीज झाले. शिवाय ती 'धडक २' मध्येही दिसणार आहे. 

टॅग्स :तृप्ती डिमरीरणबीर कपूरबॉलिवूड