Join us

अनिल झळकणार इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये

By admin | Updated: June 12, 2016 01:16 IST

अभिनेता अनिल कपूर ‘२४’ या मालिकेत व्यग्र असल्याने त्याने गेल्या वर्षभरात कोणताही चित्रपट केलेला नाही. संपूर्ण वेळ केवळ ‘२४’ या मालिकेसाठी द्यायचा, असे त्याने ठरवल्यामुळे

अभिनेता अनिल कपूर ‘२४’ या मालिकेत व्यग्र असल्याने त्याने गेल्या वर्षभरात कोणताही चित्रपट केलेला नाही. संपूर्ण वेळ केवळ ‘२४’ या मालिकेसाठी द्यायचा, असे त्याने ठरवल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता, पण आता या मालिकेचे चित्रीकरण संपले असून, ही मालिका जुलैमध्ये सुरूही होणार आहे. मालिका जुलैमध्ये सुरू झाली की, लगेचच अनिल त्याच्या कामाला पुन्हा लागणार आहे. अनिल एका इंटरनॅशनल प्रोजेक्टच्या चित्रीकरणासाठी सुरुवात करणार आहे. हे प्रोजेक्ट कोणते असणार, याबाबत त्याने माहिती देण्यास नकार दिला असला, तरी लवकरच या प्रोजेक्टबाबत माध्यमांसोबत बोलणार असल्याचे त्याने म्हटले आहे.